पालक-विद्यार्थ्यांना बळ देणारी ‘बुध्दि’बळ कार्यशाळा : निकेत पावसकर

पालक-विद्यार्थ्यांना बळ देणारी ‘बुध्दि’बळ कार्यशाळा : निकेत पावसकर

*कोकण Express*

*पालक-विद्यार्थ्यांना बळ देणारी ‘बुध्दि’बळ कार्यशाळा : निकेत पावसकर*

*एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांच्या कार्यशाळेला प्रारंभ*

*कासार्डे ; संजय भोसले*

एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांनी असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांना भविष्यात योग्य दिशा दिली आहे. त्यांची ‘बुध्दि’बळ ही वेगळी कार्यशाळा अनेक पालक आणि विद्यार्थी यांना बळ देत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यासाठी निश्चितपणे  ‘बुध्दि’बळ ही कार्यशाळा एकदातरी केली पाहिजे, असे प्रतिपादन संदेश पत्र संग्राहक, पत्रकार निकेत पावसकर यांनी केले.

तळेरे येथील एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ यांच्या 20 दिवशीय ‘बुध्दि’बळ या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन निकेत पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव पांचाळ उपस्थित होते.

या कार्यशाळेत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दररोज दृकश्राव्य माध्यमातून ही कार्यशाळा होणार आहे. यामध्ये अभ्यासाची सायंटिफीक पध्दत शिकवली जाणार असून अभ्यासाचा स्पीड कसा वाढवायचा, कठिण अभ्यासही सहज लक्षात कसा ठेवायचा, तिन चार अंकी गुणाकार सेकंदात कसा सोडवायचा, डीप्रेशनमधुन बाहेर कसे पडायचे आणि जिंकण्यासाठी आत्मविश्वास कसा निर्माण करायचा यासारख्या अनेक मुद्द्यांवर यामध्ये मार्गदर्शन करुन तसे प्रात्यक्षिक घेतले जाते.

आजपर्यंत सदाशिव पांचाळ यांचे एक हजार कार्यक्रम महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यात झाले आहेत. तसेच, त्यांच्या मुलाखती आकाशवाणी केंद्र आणि सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!