छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा

*कोकण Express*

*छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा*

*गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश उर्फ गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने शिवाजी महाराज चौक येथे दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
याप्रसंगी नारायण राणे यांचे ढोल ताश्यांच्या गजरात व फटाके वाजवून जंगी स्वागत करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मंडळाच्या वतीने करण्यात आले. नारायण राणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला गेला सोबत नीलम राणे व आमदार नितेश राणे उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, नगरसेविका मेघा गांगण, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, डॉ. विद्याधर तायशेटे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, आशिये सरपंच महेश गुरव, सर्वेश दळवी, प्रज्वल वर्दम, गणेश तळगावकर, आनंद पारकर, कल्याण पारकर, आनंद पारकर, समीर प्रभुगावकर, नितीन पवार, श्रेयश चिंदरकर, प्रकाश सावंत, राजा पाटकर, सिद्धेश तळगावकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!