*कोकण Express*
*मनसे च्या देवगड-कणकवली मतदारसंघातील जिल्हा कार्यकारिणी ची बैठक संपन्न*
दिनांक ८ एप्रिल २०२३ रोजी ठीक १० वाजून ३० मिनिटांनी कराळे सभागृह जांभुळवाडी कसार्डे,तरळे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा कार्यकारिणी कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघाची ची बैठक पार पडली या वेळी मनसे नेते श्री शिरीष सावंत तसेच मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे यांच्या प्रमुख मार्गदनाखाली देवगड तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिकांसोबत संवाद सत्र संपन्न झाले या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनसे नेते श्री शिरीष सावंत म्हणाले देवगड तालुक्यातील भविष्यातील पक्ष वाढीच्या संधी लक्षात घेता अजून जोमाने तसेच एकजुटीने काम करून देवगड तालुक्यातील गावागावात असलेल्या पक्षप्रेमी युवा पिढीला तसेच जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून अधिकाधिक शाखांचे जाळे वाडी वस्तीवर विणण्याची संकल्पना स्पष्ट मांडली तसेच भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका लढवून जास्तीत जास्त जागांवर विजय संपादन करण्यासाठी तसेच तालुक्यातील पक्ष बांधणी साठी सर्वतोपरी सहकार्य पक्षाच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास व्यक्त केला या संबंधी बोलताना पुढे बोलताना यापुढील तालुक्यातील प्रत्येक पक्षिय आंदोलनात कार्यकर्त्यांच्या मागे पक्षाची कायदेतज्ज्ञ वकिलांची संघटना कायम सोबत असेल असे प्रतिपादन केले,या वेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकणातील आगामी भव्य सभेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली या वेळी देवगड तालुक्यामधून चित्रपट सेनेचे राज्य चिटणीस संतोष भाऊ शिंगाडे,माजी तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री मा. सचिव जगदीश जाधव देवगड मा.सह संपर्क अध्यक्ष संतोष मयेकर , नितीन पवार,मा. उपशहर अध्यक्ष गणेश सागवेकर मा.विभाग अध्यक्ष परेश आडकर,मा.तोरसोळे शाखाअध्यक्ष राजन पवार मा.उप शाखाध्यक्ष सचिन पवार कातवन मा विभाग अध्यक्ष नंदकुमार हडकर मा शाखाध्यक्ष गणेश खोत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष राकेश मिराशी महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे तालुका अध्यक्ष अमित घाडी रुपेश पांगम,सिद्धेश घाडी यांसह असंख्य महिला तसेच महाराष्ट्र सैनिक सभागृहात उपस्थित होते…

