*कोकण Express*
*माडखोल येथे दुग्धविकास प्रशिक्षण केंद्र निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सुरू..*
*सतीश सावंत यांच्या फसवेगिरीला शेतकरी बळी पडणार नाहीत; भाजप नेते महेश सारंग*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगिरथ प्रतिष्ठान, देसाई डेअरी यांनी सावंतवाडी माडखोल येथे दुग्धविकास प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. सतीश सावंत हे गेली पाच वर्ष अध्यक्ष म्हणून असताना आज निवडणूक तोंडावर आल्याने ते शेतकऱ्यांना आश्वासन देत फसवणूक करण्याच काम करत आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हि फसवेगिरी सुरु आहे. याला आमचे शेतकरी बळी पडणार नाही. असा जोरदार प्रहार भाजप नेते महेश सारंग यांनी केला. तर या फसवणुकीला जनतेन बळी पडू नये असा आवाहन त्यांनी केल आहे. तर माजी मुख्यमंत्री खारदार नारायण राणे यांच्या माध्यमातूनच जिल्हा बँकेचा विकास होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी दुग्धविकास मंत्री असताना कणकवलीमध्ये डेअरी बांधली आणि शेतकऱ्यांना प्रतेक घरात मुरहा जातीची म्हैस देण्यात आली. त्यावेळी डेअरीमध्ये दररोज पंचवीस ते तीस हजार लीटर दूध रोज जमा होत होते. त्यानंतर त्या महैशीची वासरे होती तिथपर्यंत डेअरीत दुध येत होते. नंतर हळुहळु दूध कमी झाले आणि डेअरी बंद करण्यात आली. डेअरी चालू ठेवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. परंतु ते सफल झाले नाहीत. शेतकऱ्यांनी अनेक बँकाकडून कर्ज घेतली. काही जणांनी आपली घर-दार विकली. मुरहा जातीच्या म्हैशीना येणारा खर्च आणि दुधातून मिळणार उत्पन्न याचा कुठेही ताळमेळ लागत नाही. एक किंवा दोन वर्ष म्हशी पाळणे परवडते. नंतर म्हैशी दुध देण्याचे बंद झाले की, त्या जनावरांना पोसणे अवघड काम असते. स्वत: सतिश सावंत यांनी स्वताच्या गावात आणि कणकवली तालुक्यातील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज दिली. त्यापैकी कीती शेतकरी सुखी झाले? किती जणांना भिक मागायला लावली? हे प्रथम पहावे. सिंधुदुर्ग बँकेला आपला शेतकरी सुखी व्हावा असे वाटत असेल, तर ज्याप्रकारे खासदार नारायण राणे यांनी दुग्धविकास मंत्री असताना फुकट जनावरे दिली, तशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्यांना फुकट म्हैशी देण्याचा कार्यक्रम करावा. ते शेतकर्यांच्या हिताचे असेल कारण अजूनही काही शेतकर्यांच्या गोठ्यामधे खासदार नारायण राणे यांनी दुग्धविकास मंत्री असताना दिलेल्या म्हैशी आहेत. सिंधुदुर्ग बँक सर्वाना कर्ज देते. शेतकर्यांच्या कर्जापोटी जमीन तारण घेऊन थकीत रक्कम झाल्यावर रोज वसुली पथक पाठवते. त्यावेळी कोणीही शेतकर्यांच्या मदतीला धावून येत नाही. असा टोला त्यांनी लगावला.

