मालवण खरेदी विक्री संघाच्या नूतन वास्तूचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

मालवण खरेदी विक्री संघाच्या नूतन वास्तूचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन

*कोकण Express*

*मालवण खरेदी विक्री संघाच्या नूतन वास्तूचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन*

*मालवण | प्रतिनिधी*

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सोमवार पेठ येथील नूतन वास्तूचे सकाळी १० वाजता माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती चेअरमन राजन गावकर यांनी दिली आहे.

भूमिपूजन रविवार ९ एप्रिल रोजी

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सिंधू बझार, भारत गॅस तसेच शेतकऱ्यांसाठी खते, औषधे विक्री करण्यात येते. त्यात आता एका नवीन प्रकल्पाची भर पडत आहे. समुद्र किनारा नजीक असणाऱ्या या प्रकल्पाच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन रविवारी ९ एप्रिल रोजी माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी सर्व सभासद, शेतकरी, ग्राहक, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन राजन गांवकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!