*ना. राणेंच्या वाढदिवसानिमित्त घुमडे आणि वायरी…..*

*ना. राणेंच्या वाढदिवसानिमित्त घुमडे आणि वायरी…..*

*कोकण Express*

*ना. राणेंच्या वाढदिवसानिमित्त घुमडे आणि वायरी…..*

*भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यावतीने आयोजन*

*मालवण ः प्रतिनिधी*

भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यावतीने घुमडे येथील श्रीदेवी घुमडाई मंदिर आणि वायरी गर्देरोड येथील महापुरुष मंदिरात सोमवारी १० एप्रिल रोजी लघुरुद्र आणि ब्राम्हण भोजन आयोजित करण्यात आले आहे.

महापुरुष मंदीर वायरी गर्देरोड येथे माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या नियोजनात आणि दत्ता सामंत यांच्या आयोजनात. सकाळी १० वाजता लघुरूद्र अभिषेक तर दुपारी १२ वाजता ब्राम्हण भोजन आयोजित करण्यात आले आहे. तर घुमडाई मंदीर घुमडे येथे दत्ता सामंत यांच्या आयोजनात सकाळी १० वाजता लघुरूद्र अभिषेक तर दुपारी १२ ते ३ या वेळेत ब्राम्हण भोजन आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी आणि नागरीकांनी या अन्नछत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी मालवण यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!