*कोकण Express*
*शिवसेना इन्सुली उपविभाग प्रमुखपदी श्री विजय देसाई यांची नियुक्ती…*
*बांदा ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावचे सुपुत्र तथा ग्रामपंचायतीचे तरुण तडफदार नवनिर्वाचित सदस्य श्री विजय शंभा देसाई यांची शिवसेना इन्सुली उपविभाग प्रमुखपदी (शेर्ले पंचायत समिती) नुकतीच निवड झाली आहे. तसे पत्र त्यांना मा. सचिव श्री मोरे महाराष्ट्रराज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दीपकभाई केसरकर यांनी त्यांना दिले आहे.
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख श्री. अशोकराव दळवी, महिला जिल्हा प्रमुख सौ. निता सावंत, कविटकर सावंतवाडी
तालुका प्रमुख श्री नारायण राणे, उपतालुका प्रमुख मंगलदास देसाई व इतर शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेचे सरसेनापती मा. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार व ८०% समाजकारण हे मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील शिवसेना कार्यकर्ते यांच्याशी प्रामाणिक पोहोचवण्यासाठी काम करेन असे नियुक्ती नंतर श्री. विजय देसाई यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
श्री विजय देसाई हे शिवप्रेमी असून त्यांनी श्री साई समर्थ ट्रक चालक-मालक संघटनेचे मा. सचिव म्हणून काम पाहिले आहे त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे डेगवे पंचक्रोशीतील त्यांचे अभिनंदन होत आहे.