*कोकण Express*
*नाणार येथील जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार…*
*विनायक राऊत; यापूर्वी झालेले सर्व जमिनीचे व्यवहार रद्द होणार…*
*सिंधुदुर्गनगरी ता .०३:*
नाणार येथील जमिनी संबंधित शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत.यासंदर्भात झालेले सर्व व्यवहार रद्द केले जाणार आहेत,असा दावा शिवसेनेचे सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी तिला आहे.दरम्यान ज्यांना पैसे मिळाले त्या स्थानिक लोकांचा फायदा झाला आहे.मात्र बाहेरच्या लोकांचे पैसे बुडाले तर नुकसान नाही,असेही श्री.राऊत यांनी यावेळी सांगितले.
ते आज येथे बोलत होते.ते म्हणाले,कोणत्याही परिस्थितीत नाणार सारखा प्रदूषणकारी प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. याठिकाणी प्रदूषणकारी प्रकल्प झाल्यास येथील पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे आता लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्यांना जमिनी परत देण्यात येणार आहेत.