*कोकण Express*
*कणकवली 8 ते 9 एप्रिल दरम्यान सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग 2023 स्पर्धा*
*आमदार नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली बॅडमिंटन क्लब कणकवली आणि के. एन. के. स्मैशर्स च्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा 8 ते 9 एप्रिल दरम्यान नगरपंचायतच्या नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये संपन्न होणार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्याला रोख रु.. 25 हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. द्वितीय विजेत्याला रोख रु. 20 हजार आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक नगराध्यक्ष नलावडे यांनी व द्वितीय पारितोषिक के. एन. के. स्मैशर्स यांनी पुरस्कृत केले आहे. या स्पर्धेचा बैंडमिंटन प्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.