आ. नितेश राणे यांनी कणकवली बस स्थानकांची केली पाहणी

आ. नितेश राणे यांनी कणकवली बस स्थानकांची केली पाहणी

*कोकण Express*

*आ. नितेश राणे यांनी कणकवली बस स्थानकांची केली पाहणी*

*पर्यटन विकासासाठी मिनी बस संकल्पना राबविणार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आ. नितेश राणे यांनी गुरुवारी कणकवली एस.टी. स्थानकाची पाहणी केली. विभाग नियंत्रण अभिजित पाटील यांच्याशी बसस्थानकातील प्राथमिक सोयींविषयी चर्चा केली. तसेच एस. टी. स्थानकातील शौचालय, बैठक व्यवस्थेतील दुरुस्ती, पंख्यांची उपलब्धता, सांडपाण्याचा निचरा आणि परिसर स्वच्छता तातडीने करून घेण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली बसस्थानक बीओटी तत्त्वावर विकसित करण्यास मंजुरी दिली सुरज आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण केले जाणार आहे. असे आ. राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग हा पर्यटनट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक स्थळे विकसित करण्यात आली आहेत. या स्थळांवर पर्यटकांना पोहोचण्यासाठी मिनीबसची संकल्पना राबविण्याविषयीची प्राथमिक चर्चा आ. राणे यांनी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याशी केली. मिनीबसच्या माध्यमातून पर्यटक एकाच वेळी पर्यटन स्थळांना भेटी देऊन परत येतील आणि ही संकल्पना एसटीच्या महसुलात भर घालणारी त्याचप्रमाणे पर्यटन वाढवणारी आहे. नव्याने मिनीबस प्राप्त होताच ही संकल्पना युद्धपातळीवर राबवण्यात येणार असल्याचे आ. राणे यांनी सांगितले.

राणे यांनी पदाधिकान्यांशी केलेल्या चर्चेत बस स्थानकामधील डांबरीकरण गेले कित्येक वर्ष केलेले नाही, हे लक्षात आले. त्यामुळे बसस्थानकात धूळ, खड़े याचा त्रास प्रवाशांना होतो. यासाठी डांबरीकरणाचा जो प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आलेला आहे, तो मंजूर करून घेण्यासाठी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!