कणकवलीत उड्डाण पुलाखाली क्रिक्रेट आणि फुटबॉलचे मैदान

कणकवलीत उड्डाण पुलाखाली क्रिक्रेट आणि फुटबॉलचे मैदान

*कोकण Express*

*कणकवलीत उड्डाण पुलाखाली क्रिक्रेट आणि फुटबॉलचे मैदान!*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मागणीला यश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उड्डाणपुलाखालील जागेत अंडरआर्म क्रिकेट आणि फुटबॉल खेळाचा आनंद क्रीडापटू तसेच बच्चे कंपनीला लुटता येणार आहे. आ. नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मागणीनुसार उड्डाणपुलाखाली मैदान उपलब्ध होणार आहे. आ. राणे यांच्या हस्ते गुरुवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा

तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक संजय कामतेकर, विराज भोसले, माजी नगरसेवक बंडू गांगण, सुशील पारकर, रघुनाथ नाईक, आनंद पारकर, गौरांग खानविलकर आदी उपस्थित होते. अंडरआर्म क्रिक्रेट तसेच फुटबॉल प्रेमींना रिकाम्या वेळेत या ठिकाणी खेळाचा आनंद मिळणार आहे. यासाठी दोन्ही सर्व्हिस रोडच्या बाजूने सुरक्षेसाठी जाळी लावण्यात येणार आहेत. ज्यामुळे चेंडू जाळ्या बाहेर जाणार नाही. याचा फायदा बच्चे कंपनीसह शहरातील क्रीडाप्रेमींना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!