फोंडाघाट गावात हिरकणी साधन केंद्र व फोंडा ग्रामपंचायत यांच्यातर्फे क्रांतिज्योती सावित्री बाई फुले जयंती साजरी

*कोकण Express*

*फोंडाघाट गावात हिरकणी साधन केंद्र व फोंडा ग्रामपंचायत यांच्यातर्फे क्रांतिज्योती सावित्री बाई फुले जयंती साजरी*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित हिरकणी लोक संचालित साधन केंद्र कणकवली व फोंडाघाट ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज फोंडाघाट गावात क्रांतिज्योती सावित्री बाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला फोंडा ग्राम पंचायत ग्रामसेवक चौउल कर साहेब, सदस्या जोईल व लाड मॅडम, जनशिक्षण च्या दाभोलकर मॅडम, CRP सलोनी चव्हाण, सहयोगीनी श्रध्दा चोरगे व गटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबार्इं फुलेंच्या प्रतिमेला हार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मनीषा चव्हाण यांनी सावित्री बाई फुले यांच्या जीवनपर कथन केले. संचीता जाधव व मनीषा जाधव मॅडम यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य मनीषा लाड व जोईल मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर महिलांचे विविध खेळ घेऊन त्यांना चहा नाष्टा देऊन कार्यक्रम संपविण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्योगिणी श्रद्धा चोरगे यांनी केले. फोंडा गावचे सरपंच श्री. संतोष आग्रे साहेब यांनी कार्यक्रमाला आर्थिक योगदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!