*कोकण Express*
*सावंतवाडीतील “त्या” गाळे धारकांना न्यायालयाचा दिलासा…..*
*वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश; निरवडेकर यांचे मानले व्यावसायिकांनी आभार…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील पंचम खेमराज महाविद्यालया शेजारी असलेल्या गाळेधारकांना सावंतवाडी न्यायालयाने दिलासा दिला आहे.
त्या ठिकाणी अंतिम आदेश होईपर्यंत कोणत्याही व्यावसायिकाचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. याकामी अँड. अनिल निरवडेकर यांनी त्यांना सहकार्य केले. याबद्दल त्यांचे गाळेधारकांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
येथील गाळेधारक जमिन मालक व सावंतवाडी नगरपालिका यांच्यात वाद सुरू आहेत. त्यामुळे त्यांनी हे गाळे खाली करण्यासाठी
महावितरणकडून वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाविरोधात तेथील त्या गाळेधारकांनी सावंतवाडी न्यायालयात दाद मागितली. यावर न्यायालयाने अतिम आदेश होईपर्यंत कनेक्शन तोडण्यात येऊ नये, असा निकाल दिला आहे..