*कोकण Express*
*डीएड बरोजगार उमेदवारांच्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे- जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
दिपक केसरकर शिक्षणमंत्री आहेत त्यामुळे ओरोस येथे सुरू असलेल्या डीएड बरोजगार उमेदवारांच्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी म्हटले आहे. भाजपाच्या वरिष्ठांकडे आम्ही संपर्क साधला आहे असे ते म्हणाले.
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे भाजपा या निवडणुका शतप्रतिशत लढणार असून ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयाप्रमाणे आगामी निवडणुकातही विजय संपादित करू असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केला. तर केसरकर यांनी येथील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजे त्यांना भाजपाच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य आम्ही करू असे सांगत केसरकर यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेने केलेले आंदोलन हा त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार असल्याचे ते म्हणाले श्री. तेली यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब, मनोज नाईक, आनंद नेवगी, महेश धुरी, रवींद्र मडगावकर, प्रथमेश तेली आदी उपस्थित होते. श्री तेली म्हणाले आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुका डोळ्यावर ठेवून भाजपा ने आपली वाटचाल सुरू केली आहे या निवडणुका अशात प्रतिसाद लढवण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहेत ज्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यात भाजपाला यश प्राप्त झाले ते पाहता आगामी निवडणुकांमध्ये ही भाजपा निश्चितच यश प्राप्त करेल केंद्रात आणि राज्यात असलेली सत्ता लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना या सत्तेचा उपयोग झाला पाहिजे यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर आहोत या ठिकाणी पर्यटन दृष्ट्या जिल्ह्याचा विकास व्हावा सावंतवाडी शहराला गतवैभव प्राप्त व्हावे येथील मोती तलाव सुशोभीकरणाच्या दृष्टीने विचार व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहोत परंतु हे करत असताना
प्रत्येकाची इच्छाशक्ती ही तितकेच महत्त्वाची आहे.. ते म्हणाले ठाकरे शिवसेनेकडून येथील एसटी स्टैंड वर केसरकर यांच्या विरोधात एप्रिल फुल आंदोलन केले हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे संदर्भात आपण अधिक भाष्य करणार नाही परंतु सत्तेतील मंत्री या नात्याने कैसरकारांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावी या मताचा मी सुद्धा आहे त्यासाठी त्यांना लागणारे सर्व ते सहकार्य आम्ही निश्चितच करू दुसरीकडे जिल्ह्यात डीएड धारकांनी आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे त्याना न्याय मिळाला पाहिजे यासाठी वरिष्ठ पातळीवर पण लक्ष वेधले आहे परंतु शिक्षण मंत्री या नात्याने केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

