*कोकण Express*
*भाजप शिवसेना शिंदे गटातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद…*
*सावरकरांचे विचार घराघरांत पोचविण्याची गरज :निलेश राणे* मालवणात सावरकर गौरव यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद…*
*मालवण ः प्रतिनिधी*
भाजप शिवसेना शिंदे गटातर्फे ढोल ताशांच्या गजरात आज शहरात माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. भरड ते बंदर जेटीपर्यंत काढण्यात आलेल्या या गौरव यात्रेत मोठ्या संख्येने भाजप शिवसेना शिंदे गट व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते बंदर जेटी येथे निलेश राणे यांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करून व सागराचे पूजन करून या गौरव यात्रेचा समारोप करण्यात आला.
यात्रेत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, देवदत्त सामंत, अशोक सावंत, बाबा परब, धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, भाऊ सामंत, महेश मांजरेकर, उमेश नेरुरकर, परशुराम पाटकर, राजू परुळेकर, अभय कदम, अवि सामंत, पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, स्नेहा आचरेकर, मोहन वराडकर, ललित चव्हाण, मदार लुडबे, निनाद बादेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, बबन शिंदे, राजा गावकर तसेच भाजप व शिवसेना गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. श्री. राणे म्हणाले, मी पाच वर्षे राहुल गांधींसोबत खासदार होतो. त्या पाच वर्षात राहुल गांधींना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी वीर सावरकरांचा अपमान करण्याचे काम केले. राहुल गांधी हे सकाळी काय बोलतात संध्याकाळी काय करतात हे त्यानाच माहिती नाही. राहुल गांधी कधीही गांधी होऊ शकत नाहीत कारण त्यांचा व गांधींचा संबंध नाही. काँग्रेसने देशात आणीबाणी लादली. देशाला पेटवत ठेवले काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते असे पुस्तकातून दाखवण्यात आले. त्यामुळे आपणा सर्वांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घराघरात पोचविण्याची गरज आहे.

