*कोकण Express*
*आरोदा येथे वाळू तस्करांना दणका, सात बोटी ताब्यात, एक जाळली….*
*महसुल व पोलिसांची कारवाई; दोघे कामगार ताब्यात, होड्या कुणाच्या? चौकशी सुरू…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आरोंदा येथील खाडीपात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बाळू तस्करांना आज महसुल व पोलिस प्रशासनाने दणका दिला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या तब्बल सात बोटी ताब्यात घेतल्या तर एक बोट जाळून टाकली आहे. त्या ठिकाणी कांदळवनात असलेली झोपडी नष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य काही जण पळून गेले. ही कारवाई साचतवाडी तहसिलदार अरुण उंडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी पोलिसांकडुन करण्यात आली. दरम्यान त्या नेमक्या बोटी कुणाच्या? याची चौकशी सुरू असून संबधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे तहसिलदार उडे यांनी सांगितले..
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोंदा येथील खाडीत गोव्यातील काही लोकाकडुन बिनदिक्कत वाळू उपसा केला जात असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार श्री. उंडे यांनी सावंतवाडी पोलिसांना मदतीला घेवून त्या ठिकाणी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी आठ बोटी आढळून आल्या. त्यातील एक बोट जाळून टाकण्यात आली असून उर्वरित सात बोट ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच याप्रकरणी दोघा परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत श्री. उंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली ते म्हणाले, गेले अनेक दिवस तक्रारी होत्या. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र संबधितांच्या बोटी तो ताब्यात घेण्यात आला असून ही वाळू नेमकी कोणाची? बो केली नाही तर बाजूला वाळूचा मोठा साठा आढळून आला आहे. याची चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे करण्या आहे. असे उंडे म्हणाले. या कारवाईत मंडळ अधिकारी विनायक रुनाथ गुरव, तलाठी पास्ते कविटकर गावडे, खान मुळीक, गोरे पाटोळे तसेच पोलिस उपनिरिक्षक आनंद यशवंते आटी सहभागी झाले होते

