खनिकर्म अधिकाऱ्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर मनसेचे आक्रोश आंदोलन स्थगित

खनिकर्म अधिकाऱ्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर मनसेचे आक्रोश आंदोलन स्थगित

*कोकण Express*

*खनिकर्म अधिकाऱ्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर मनसेचे आक्रोश आंदोलन स्थगित…*

*परशुराम उपरकरांकडुन शिष्टाई; संबंधित शेतकऱ्यांना नुससान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करू, अजित पाटील…*

*दोडामार्ग ःःप्रतिनिधी* 

कळणे येथील संबंधित नुकसानग्रस्तांना न्याय देण्यात येईल, त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी दिल्यानंतर मनसेचे युवा कार्यकर्ते अभय देसाई व कळणे ग्रामस्थांनी पुकारलेले आक्रोश आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. याबाबत संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी श्री. पाटील यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत आम्ही संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू, त्या दृष्टीने पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी अधिकारी पाटील यांनी दिले. त्यामुळे आक्रोश आंदोलनाचा इशारा मागे घेण्यात आला आहे.

यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, जिल्हा संघटक अ ओटवणेकर, संदेश शेटये, संदिप लाड, आबा चिपकर, निलेश

उपजिल्हा संघटक अभय देसाई, कुणाल किनलेकर, विशाल देसाई आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!