*कोकण Express*
*चिपळूण येथिल मोरवणे येथे शासकीय इतमामात अंतसंस्कार*
*रत्नागिरी प्रतिनिधी*
*रत्नागिरी :*
भारत-चीन सीमेवर देशसेवा बजावताना शहीद झालेले सुभेदार अजय ढगळे यांना चिपळूण येथे त्यांच्या राहत्या घरी उपस्थित राहून रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत यांनी उपस्थित राहून मानवंदना
दिली आहे.
देशसेवा करत असताना शहीद झाले. शहीद अजय ढगळे हे कारगील याआधी झालेल्या लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज
भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी जागची रेकी करण्यासाठी गेलेले मोरेवणे गावचे सुपुत्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे बहादुर टिममध्ये देखील होते. यावेळी शहीद अजय ढगळे यांना चिपळूण येथिल त्यांच्या राहत्या गावी शासकीय इतमामात अंतसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने चिपळूण तालुक्यासह जिल्हयात शोककळा पसरली आहे. यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी पुजार, माजी आमदार सदानंद चव्हाण, आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.