*कोकण Express*
*मुंबई -गोवा महामार्गावरील सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडे तोडल्या प्रकरणी खन्ना यांच्या विरोधात गुन्हा दाखल..*
*”अखेर” आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या पाठपुराव्याला यश..!*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
झाराप ते कसाल एन.एच.६६ महामार्गावरील साळगाव जांबरमळा रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली सुमारे 150 झाडांची तोड झाली होती.संबंधित विभागाने तक्रार कुडाळ पोलीस केली होती.या संदर्भात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग तर्फे मागणी करण्यात आली होती.याचा पाठपुरावा करण्यात देखील आला होता. “अखेर” आज दिलेल्या तक्रारीनुसार खन्ना यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महामार्गावरील साळगाव जांबरमळा येथील हॉटेल कारगिल जवळ रस्त्याच्या दुतर्फा रोपवन उपक्रमा अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाने 150 झाडे लावली होती ही झाडे मुल्यांकन करून सुमारे पंधरा हजार किंमतीची होती. दरम्यान ही झाडे जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आली या झाडाचे कुंपण काढण्यात आले.याबाबत सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल सुनील सावंत यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.तक्रारीनुसार खन्ना यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.