शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाकडून मिरची महोत्सवाचे शुभारंभ

शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाकडून मिरची महोत्सवाचे शुभारंभ

*कोकण Express*

*शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाकडून मिरची महोत्सवाचे शुभारंभ*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. कणकवली या संघाकडून दरवर्षी प्रमाणे शेतकऱ्यांसाठी मिरची महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना माफक दरात मिरची उपलब्ध व्हावी, यास्तही मिरची महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचा शुभारंभ तहसिलदार रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

शेतकरी संघाच्या बाजूला समता बाझारजवळ हा मिरची महोत्सव सुरु करण्यात आला आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विठठ्ठल देसाई, संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, संचालिका सौ. विनीता बुचडे, सौ. स्मिता पावसकर, तसेच संचालक गुरुप्रसाद वायंगणकर, रघुनाथ राणे, श्रीपाद पाताडे, संजय शिरसाट, अतुल दळवी, प्रशांत सावंत, व्यवस्थापक गणेश तावडे व शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!