*कोकण Express*
*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सरचिटणीस तथा पत्रकार विष्णू चव्हाण यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार..*
*श्री.साईबाबा भक्तसेवा मंडळ बांदा यांचा पुढाकार:श्री.पिळंणकर परीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
बांदा येथे साईभक्त कै.बाप्पा केसरकर सेवा संस्थेने सालाबादप्रमाणे याहीवर्षी रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजित केले होते.
कार्यक्रमात प.स्वामी अवधुतानंद सरस्वती महाराज यांच्या मानपत्राने आं.मा.वेल्फेअर असोसिएशन जिल्हा सरचिटणीस तथा पत्रकार विष्णू चव्हाण आंबोली यांचा शालश्रीफळ सन्मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला
यावेळी आं मा.वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष राकेश केसरकर यांच्या संकल्पनेतुन श्री.पिळणकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.यावेळी
आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमात बांदा सरपंच सौ.प्रियांका नाईक उपसरपंच जावेद खतिप माजी जि.प .सदस्य सौ.कोरगांवकर,पत्रकार मिलिंद धुरी,पत्रकार आनंद कांडरकर,आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे सचिव ॲड.मोहन पाटणेकर,व्यापारी सेल अध्यक्ष बाळा कोरगांवकर इतर मान्यवर उपस्थित होते .
राकेश केसरकर आणि परिवार हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे साजरा करतात.साईबाबा यांच्या आशीर्वादाने या पुण्य भुमीत केसरकर विविध धार्मिक कार्यक्रम करत असतात.
कै.बाप्पा केसरकर यांच्या साईभक्तीने चमत्कार घडला इंग्लड येथील चित्रकाराने साईबाबा ची दोन तैलचित्रे रेखाटली होती, हि तैलचित्रे इ.स.पुर्वी रेखाटली होती. हि चित्रे एक तेलंगणा येथे अवधुतानंद सरस्वती महाराज यांच्या मठात ठेवले होते तर दुसरे बांदा येथील केसरकर कुंटुबाच्या सेवेकरीता ठेवण्यात आले.आज हा वारसा राकेश केसरकर कुंटुबांने पुढे अखंडित चालू ठेवला आहे
कार्यक्रमाच्या शेवटी राकेश केसरकर यांच्या मान्यवराचे प्रस्ताविक आभार मानले.