नवीन दहा एसटी गाड्या दाखल.

नवीन दहा एसटी गाड्या दाखल.

*कोकण Express*

*नवीन दहा एसटी गाड्या दाखल..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

रा. प. महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाला बीएस ६ इंजिनच्या १० गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. या दहा लालपरी गाड्यांसोबतच पुढील काही दिवसांत अजून २५ ते ३० नवीन गाड्या उपलब्ध होतील, अशी माहिती विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून रा. प. महामंडळाने ‘नवीन गाड्यांची खरेदी न केल्याने सिंधुदुर्ग विभागालाही नवीन गाड्या उपलब्ध झाल्या नव्हत्या. त्यातच काही गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्याच्या योग्यतेच्या झाल्या आहेत. परिणामी नवीन गाड्यांची प्रतीक्षा होती. काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या दोन हजार गाड्यांपैकी सिंधुदुर्ग विभागाला दहा गाड्या उपलब्ध झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!