दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट

दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट

*कोकण Express*

*दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट*

*तळकट ते कोलझर कुब्रंल रस्ता डांबरीकरण कराअन्यथा तीव्र आंदोलन करणार पत्रकार श्री.शिरिष नाईक यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला इशारा*

*दोडामार्ग : प्रतिनिधी*

दोडामार्ग तालुक्यातील कोलझर ते कुब्रंल हा जिल्हा परिषद रस्ता तसेच पडवेमाजगाव ते तळकट हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता वाहतुकीसाठी खराब झाला आहे. गेली पाच वर्ष हा रस्ता पुर्णपणे वाहतुकीसाठी निकामी झाला आहे.हा रस्ता ग्रामसडक मधून मंजुर आहे असे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात अजुन रस्त्याच्या कामाल सुरुवात झाली नाही.त्यामुळे ग्रामस्थांमधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.या रस्ताचे काम आठ दिवसांत सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार श्री.शिरिष नाईक यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.*

*पडवेमाजगाव ते तळकट हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले.वाहने चालविणे शक्य नाही.असे असतानाही बांधकाम विभाग गप्प आहे.तळकट ते कोलझर , कुब्रंल,कोलझर मराठी शाळा ते ग्रामपंचायत, हायस्कूल ते श्री देवी माऊली मंदिर पर्यंत रस्त्या वाहतुकीसाठी खराब झाला आहे. रस्त्यावर डांबराचा अंश पण शिल्लक नाही, रस्त्यावर फले मोठे खड्डे पडले आहे.वारोवार अपघात होत आहे.ग्रामस्थामधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.आठ दिवसांत रस्ता डांबरीकरण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार श्री.शिरिष नाईक यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!