*कोकण Express*
*ठाकरे गटाच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महागाईवर लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन*
*भावोजी भावोजी….. म्हागायचे खोके….. एकनाथ म्हणतात सगळंच ओके…..*
पन्नास खोके, महागाई ओके, या सह अनेक घोषणा देत महागाईच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने कणकवली येथील पटवर्धन चौकात महागाई विरोधी आंदोलन सुरू छेडले. यावेळी महिलांनी भावोजी भावोजी….. म्हागायचे खोके….. एकनाथ म्हणतात सगळंच ओके….. दिल्लीतलो चायवालो खय हावलो म्हागायचो चटको गरीबाक लागलो…… गाडी इली गाडी इली गॅस सिलेंडरची गाडी.! बायका पोरा चीडीचाप झाली.आनंदाचो शिधो मिळालो काय गो, साखर, तांदळाचा पोता पळाला खय गो..! अशा घोषणा व फलक हातात घेत चुलीवरची भाकरी आणि गॅस पे चाय हे अनोखे आंदोलन पटवर्धन चौकात लक्षवेधी ठरले.
दरम्यान यावेळी पटवर्धन चौकात आमदार वैभव नाईक, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, उप महिला तालुकाप्रमुख संजना कोलते, स्वरूपा विखाळे, मानसी मुंज, दिव्या साळगावकर, , माधवी दळवी प्रतिभा अवसरे रोहिणी पिळणकर संजना साटम, जिल्हा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड, तालुका प्रमुख शैलेश भोगले, निसार शेख, कन्हैया पारकर, महेश कोदे यांच्यासह १५० हुन अधिक महिला या महागाई विरोधी आंदोलनात सहभागी झाल्या. या आंदोलनाच्या माध्यमातून महागाई सोबतच सर्वसामान्य जनतेचे महागाई मुळे कंबरडे मोडल्याकडे लक्ष वेधण्यात आले.