नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजनगर रेवडेकर घर ते वरूणकर घर पाणंद मंजूर

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजनगर रेवडेकर घर ते वरूणकर घर पाणंद मंजूर

*कोकण Express*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजनगर रेवडेकर घर ते वरूणकर घर पाणंद मंजूर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावात सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजनगर रेवडेकर घर ते वरूणकर घर व चाफेकर घर पाणंद शुभारंभ सेवानिवृत्त कर्मचारी अनिल म्हाडगूत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला व नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक संजय कामतेकर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला.

कणकवली शहरातील अनेक कामांना मंजुरी मिळाली असून काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. या कामाबद्दल नगरसेवक संजय कामतेकर व सर्व स्थानिक ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

यावेळी विजयकुमार सावंत, सुहास वरूणकर, मनोहर दळवी, प्रशांत बुचडे, बाबू गुरव, दिगंबर रेवडेकर, डॉ. चाफेकर, दर्शना तावडे, सुनिता कदम, नेहा रेवडेकर, सीमा उबाळे, जावेद शेख, नवू झेमणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!