*कोकण Express*
*देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीपदी संतोष तारी, तेजस मामघाडी, विशाल मांजरेकर विजयी*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतीच्या निवडणुकीध्ये बांधकाम सभापतीपदी तेजस मामघाडी, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी संतोष तारी व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी विशाल मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी शिवसेना नगरसेवकांना व्हीप बजावण्यात यावा असा दिलेला आदेश धुडकावून लावला.
देवगड जामसंडे न.पं.च्या विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणुक प्रांताधिकारी तथा पीठासन अधिकारी वैशाली राजमाने, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत देवगड नगरपंचायत सभागृहात पार पडली.यावेळी शिवसेना महाविकास आघाडीच्यावतीने बांधका समितीच्या सभापतीपदासाठी तेजस मामघाडी, भाजपाच्यावतीने प्रणाली माने, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी संतोष तारी तर भाजपाच्यावतीने रूचाली दिनेश पाटकर, सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी विशाल मांजरेकर तर भाजपाच्यावतीने आद्या गुमास्ते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.तिन्ही सभापतीपदांसाठी मतदान झाले.याध्ये बांधकाम सभापतीपदी तेजस मामघाडी, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी संतोष तारी व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी विशाल मांजरेकर हे निवडुन आले.नवनिर्वाचित सभापतींचे नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांनी अभिनंदन केले.यावेळी नगरसेवक नितीन बांदेकर, रोहन खेडेकर, निवृत्ती ऊर्फ बुवा तारी, मनिषा घाडी उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुखांचा आदेश धुडकावला.
शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रुख संजय आंग्रे यांनी शिवसेना महाविकास आघाडी गटनेते संताेष तारी यांच्यासह नगरसेवकांना दि. 27 मार्च रोजी होणा-या देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकीध्ये समिती पदासाठी उमेदवार असलेल्या प्रणाली मिलींद माने, आद्या गुमास्ते, रूचाली पाटकर या उमेदवारांना अधिकृतरित्या घोषित केलेले असल्याने मतदान करावयाचे आहे असा व्हीप बजावण्यात यावा असे आदेश काढले होते मात्र शिवसेना नगरसेवकांना हे आदेश धुडकावून शिवसेना महाविकास pआघाडीर्ते उमेदवार असलेल्या संतोष तारी, तेजस मामघाडी, विशाल मांजरेकर यांना मतदान करून निवडून आणले.