शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांचा ठाकरे गटाच्या नगरपंचायत गटनेत्यांना व्हीप जारी

शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांचा ठाकरे गटाच्या नगरपंचायत गटनेत्यांना व्हीप जारी

*कोकण Express*

*शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांचा ठाकरे गटाच्या नगरपंचायत गटनेत्यांना व्हीप जारी…!*

*शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जिल्हाप्रमुखांकडून पहिलाच व्हीप…!*

*देवगड नगरपंचायत’च्या विषय समिती सभापती निवडीकडे साऱ्यांचे लक्ष*

*देवगड ः प्रतिनिधी*

शिवसेनेचे नाव व पक्षाचे धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर त्याचे पडसाद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील उमटू लागले आहेत. ठाकरे गटाचे देवगड जामसांडे नगरपंचायत चे गटनेते असलेले संतोष तारी यांना शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी व्हीप बजावला आहे. देवगड जामसांडे विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत करीता हा व्हीप बजावण्यात आल्याने ठाकरे विरुद्ध शिंदे हा राज्यस्तरावर असलेला सामना थेट देवगड मध्ये आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात रंगताना पाहायला मिळणार आहे. याबाबत उपलब्ध माहितीनुसार देवगड जामसांडे नगरपंचायत च्या विषय समिती सभापती पदाच्या निवडी 27 मार्च रोजी आज होऊ घातल्या आहेत. या निवडी करता जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी हा व्हीप बजावला आहे. या व्हीप मध्ये त्यांनी संतोष तारी यांना आदेश दिले आहेत की, तुम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर निवडून आलेले आहात. देवगड जामसांडे नगरपंचायत मध्ये तुम्ही शिवसेनेचे गटनेते आहात. आज होणाऱ्या विषय समितीच्या सभापती निवडी करता पक्षाने अधिकृत जाहीर केलेल्या उमेदवारांना मतदान करण्याकरता हा व्हीप श्री आंग्रे यांनी बजावला आहे. यामध्ये बांधकाम सभापती पदासाठी प्रणाली माने, आरोग्य समिती सभापती पदासाठी आद्या गुमास्ते, तर पाणीपुरवठा समितीसाठी रुचली पाटकर यांची नावे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून व्हीप द्वारे दिली आहेत. ही नावे अधिकृतरित्या पक्षाकडून जाहीर करण्यात आल्याने या उमेदवारांना मतदान करण्याचा आदेश आंग्रे यांनी बजावल्याने आता या निवडीत काय होणार? कसे होणार मतदान? याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आता राज्यातील शिवसेना व ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आता थेट आमदार नितेश राणेंच्या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुदा अशा पद्धतीने नाव व चिन्ह मिळाल्यानंतर जिल्हाप्रमुखांनी व्हीप बजावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या निवडी जवळ व त्या अनुषंगाने होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!