वेंगुर्लेतील समाधान बांधवलकरांसह दाभोली उपसरपंच व सदस्यांनी शिवसेनेत केला प्रवेश

वेंगुर्लेतील समाधान बांधवलकरांसह दाभोली उपसरपंच व सदस्यांनी शिवसेनेत केला प्रवेश

*कोकण Express*

*वेंगुर्लेतील समाधान बांधवलकरांसह दाभोली उपसरपंच व सदस्यांनी शिवसेनेत केला प्रवेश…*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

येथील पंचायत समितीचे माजी सदस्य समाधान बांधवलकर यांनी दाभोली ग्रामपंचायत उपसरपंच व चार सदस्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सावंतवाडी येथे पार पडलेल्या या प्रवेशामध्ये बांधवलकर यांच्यासह दाभोली उपसरपंच फिल्सुअनिता फर्नांडिस, तसेच सदस्य सिसीलीया मास्कारेनास, एकनाथ राऊळ, नरेश बोवलेकर, तमास डीसोझा आणि कार्यकर्ते जॉन मेंडोत्झा यांचा समावेश आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हासमन्वयक सचिन वालावलकर, माजी पंचायत समिती सभापती सुनिल मोरकर, वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, योगेश तेली, कोचरा सरपंच, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, अनारिजन लोबो आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री केसरकर यांनी या सर्वांना प्रवेश देऊन गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करूया, असे सांगून पक्षात स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!