*कोकण Express*
*पर्यटकांना त्रास देणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही…*
*विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची माहिती..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून या जिल्ह्यात भारतातून पर्यटक येतात. मात्र जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना कुठेही वाहतूक पोलिस त्रास देत असेल आणि त्याची तक्रार आमच्याकडे आली तर त्यांची गय केली जाणार नाही. त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा कोकण विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांनी आज येथे दिला आहे.