*कोकण Express*
*भाजपा लोकसभा प्रवास योजनेचीविशेष बैठक २५ मार्च रोजी ;संयोजक विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती*
भाजपच्या लोकसभा प्रवास योजना,रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांची विशेष बैठक राष्ट्रीय महामंत्री तथा योजनेचे अखिल भारतीय संयोजक विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक २५ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे.ही बैठक ‘स्मित मल्टीपर्पज हॉल’ तळेरे वैभववाडी रोड येथे होणार आहे. या बैठकीला लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश सहसंयोजक प्रमोद जठार, प्रदेश सचिव निलेश राणे, आमदार नितेश राणे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, लोकसभा प्रभारी संदीप लेले, जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग राजन तेली, जिल्हाध्यक्ष रत्नागिरी दिपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी अपेक्षित पदाधिकारी यांनी आपल्या कार्य अहवालासह वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन लोकसभा प्रवास योजना अतुल काळसेकर यांनी केले आहे.