इंजिनिअर मनोज कदम याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

इंजिनिअर मनोज कदम याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

*कोकण Express*

*इंजिनिअर मनोज कदम याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मूळ देवगड तालुक्यातील इळये येथील व सध्या कणकवली शिवाजीनगर येथे राहणाऱ्या मनोज उर्फ बंटी श्रीधर कदम (२४) याचे मुंबई येथे हृदयविकाच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

मनोजचे बारावीपर्यंतचे शिक्षण कणकवलीतच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो मुंबईला गेला. तेथे त्याने एअर क्राफ्ट इंजिनिअर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पवनहंस या खासगी कंपनीत तो सध्या प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होता. बुधवारी त्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, विवाहीत बहिण असा परिवार आहे. त्याच्यावर इळये येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सेवानिवृत्त तलाठी श्रीधर कदम यांचा तो मुलगा तर शहरातील आर्किटेक्ट, इंजिनिअर प्रथमेश पडवळ यांचे ते मेहुणे होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!