*कोकण Express*
*गाबीत महोत्सव 24 तरिखच्या मालवण बैठकीसाठी सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ,गाबीत समाज महाराष्ट्र,व गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये दांडी येथे गाबीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच्या पुढील नियोजनासाठी शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता संस्कार हॉल धुरिवाडा,मालवण येथे गाबीत शाखांचे व जिल्हा कार्यकारिणीचे आणि नियुक्त केलेल्या सर्व कमिट्यांचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील गाबीत समाजातील सर्व आजी माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,नगरपालिका नगरसेवक,पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील आजिमाजी सदस्य तसेच विविध सहकारी संस्थांचे आजी माजी पदाधिकारी,सांस्कृतिक व विविध मंडळे,बचतगट यांचे गाबीत प्रतिनिधि असा सर्वांनी सभेस उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार श्री.परशुराम उपरकर व गाबीत समाज सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.