*कोकण Express*
*मालवणच्या क्रिकेट मैदानावरून राजकीय फटकेबाजी; येणाऱ्या काळात वैभव नाईक कॅबिनेट मंत्री असतील; संदेश पारकर*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक 2023 मालवण येथील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी मैदानावरून जोरदार राजकीय फटकेबाजी केली आहे.
वैभव नाईक यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने या स्पर्धेचं उत्कृष्ट असं नियोजन केलं. या स्पर्धेचा भव्य दिव्यपणा या स्पर्धेचे आयोजन केले .या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि कुठेतरी ही स्पर्धा मालवणच्या मैदानावर आहे. ती कुठे परदेशात खेळवली जाते हा प्रश्न माझ्यासारख्या क्रिकेट रसिकाला यानिमित्ताने पडलेला आहे. आणि म्हणून सुंदर असं नियोजन करत असताना भव्य दिव्य स्पर्धेचा आयोजन करत असताना सुंदर अशा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा थरार या निमित्ताने सगळ्या या मतदारसंघातील क्रिकेटच्या रसिकांना या ठिकाणी याचा आनंद लुटता येतोय .आणि अनेक संघ जिल्ह्यातील असतील महाराष्ट्रातील गोवा, कर्नाटक अनेक राज्यातून आलेले संघ आणि खेळाडू खरंतर क्रिकेट हा खेळ फार लोकप्रिय आहे .याची लोकप्रियता छोट्या मुलांपासून तरुणाई पासून आभार वृद्धांपर्यंत आणि म्हणून क्रिकेट ही लोकप्रियता या क्रिकेट खेळायला का मिळाली .
जागतिक स्तरावर भारतीय संघाने ज्या पद्धतीने खेळाडूंनी ज्या पद्धतीने आपली कारकीर्द उभी केली. मग त्या ठिकाणी सुनील गावस्कर असतील सचिन तेंडुलकर असतील विराट कोहली असतील असे अनेक नामवंत खेळाडू हे या भारतामध्ये खेळाडू म्हणून निर्माण झाले. आणि जागतिक स्तरावर त्यांनी विक्रम त्या ठिकाणी प्रस्थापित केला आणि फार मोठ्या प्रमाणात या खेळाबद्दल भारतीयांना आकर्षण निर्माण झालं. मैदानामध्ये क्रिकेट खेळत असताना जे प्रसंग येतात जे अनुभव येतात हे अनुभव सुद्धा प्रत्येकाच्या भावी जीवनाला आदर्श ठरणारे असतात. आणि म्हणून याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. संघ भावना आपण सगळेजण त्या ठिकाणी एकत्र येतो आणि संघ भावाने त्यांना विरोधी खेळाडूवर त्या ठिकाणी तुटून पडतो. आणि म्हणून संघ भावना ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात दुसरा गोष्ट महत्त्वाची की खिलाडीवृत्ती संघामध्ये मैदानामध्ये मॅच चालू आहे. पण जो निर्णय आहे. पंचांना दिला तरी माणूस म्हणून दिलेला असला निर्णय तरी चुकलेला असला तरी पण स्वीकारून ती मॅच पुढे खेळवली जाते. आणि जी खेळाडूंची दाखवली जाते .मैदानावर मॅच चालू असताना दोन्ही संघ जिंकण्यासाठी त्या ठिकाणी मेहनत करत असतात आणि एखाद्या संघ पराभवाच्या छायेत असतो पण तितक्या ताकतीने एक सुंदर फलंदाज त्या संघातला अशा पद्धतीची भटकेबाजी करतो की पराभवाच्या रूपांतर विजयामध्ये करतो. आणि म्हणून जीवनामध्ये आपण किती त्या ठिकाणी जरी आव्हान असली तर त्या आवाहनाला आपण त्या ठिकाणी जर मेहनत घेतली आणि जर मनामध्ये जिद्द ठरवली तर आपण यशस्वी होऊ शकता .हा सुद्धा आत्मविश्वास या तरुणाईमध्ये निर्माण करण्याचं काम या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि म्हणून क्रिकेट हा आज त्या ठिकाणी लोकप्रिय ठरलेला आहे.
वैभव नाईक यांसारखं एक झुंजार नेतृत्व नेतृत्व जे उद्धवजींच्या नेतृत्वावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर ठामपणे त्या ठिकाणी उभा राहिलय. माझी कितीही चौकशी लावा कितीही मला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करा. पण मी बाळासाहेबांच्या भगव्याच्या विचारावर निष्ठा ठेवणारा आणि उद्धवजींवर विश्वास ठेवणारा अशा प्रकारचा मी पायीक कार्यकर्ता आहे. आणि म्हणून अशा प्रकारची लढाई ही सातत्याने गेल्या सात आठ महिन्यांमध्ये या जिल्ह्यामध्ये सुरुवात सातत्याने तुमचा आशीर्वाद हा वैभव नाईक यांच्या पाठीमागे आहे .आणि मी खऱ्या अर्थाने पुढे मालवणच्या मतदारांचा मी ऋणी आहे. त्यांचा मी जाहीर असा अभिनंदन करतो. त्यांचा आभार मानतो. की आपण वैभव नाईक सारखे एका चांगल्या नेतृत्वाला या भागाचा नेतृत्व करण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर या मतदारसंघातली जी राजकीय अपप्रवृत्ती होती. ती अपप्रवृत्ती सुद्धा गाढण्याचं प्रयत्न आपण केल आहे. आणि म्हणून तुमच्या मतांमध्ये जी ताकद आहे .म्हणून वैभव नाईक महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठिकाणी नेलं. महाराष्ट्रामध्ये एक जॉईन क्लीनर आमदार म्हणून त्याची प्रतिमा निर्माण करण्याचं काम आपण पुढे मालवणच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून वैभव नाईकाची जबाबदारी आहे .
मालवणच्या आणि या जिल्ह्यातल्या जनतेने प्रेम दिलं .शिवसैनिकांनी प्रेम दिलं. या प्रेमात ना कुठेतरी त्यांचे ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न वैभव नाईक त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून भगवा चषक असेल 26 मार्च निमित्ताने त्या ठिकाणी कुडाळ मध्ये असणारे कार्यक्रम असतील वाढदिवसाच्या निमित्ताने सेवाभावी कार्यक्रमातील हा एकच ध्यास लोकांच्या विकासाच्या लोकांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाण्याचा लोकांना मदत करण्याचा आणि अशा प्रकारच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त क्रीडा असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल या सगळ्या स्तरावर अतिशय चांगल्या पद्धतीचे काम वैभव नाईक केलं.
येणाऱ्या काळामध्ये या राज्यातली सत्ता ही पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये येणार आहे .आणि पुन्हा एकदा उद्धवजी या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहे. पण त्या मुख्यमंत्री पदाच्या त्या मंत्रिमंडळामध्ये आपला लाडका सहकारी आपला एक तरुण सहकारी वैभव नाईक हे त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री असतील. आणि नुसताच कॅबिनेट मंत्री नाही तर या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. आणि म्हणून मी त्याला एवढेच सांगतो. भविष्यकाळ आपला उज्वल आहे. कितीही जरी तुम्हाला अडचणी निर्माण होत असल्या कितीही त्रास त्याठिकाणी होत असला सहन करा. ही जनता प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर आहे. हे कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहे. आणि जोपर्यंत ही ताकद आपल्याबरोबर तुम्ही कोणी त्याठिकाणी तुमचा वाकड करू शकत नाही. आणि म्हणून भविष्यामधली या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असेल या जिल्ह्याच्या लोकांना मदत असेल ही सगळी आपल्या हातात न व्हायची आहे .आणि म्हणून आपल्याला ते दिवस त्या ठिकाणी पाहायचा आहे .वैभव नाईक दोनदा आमदार झालेल्या आहेत. तिसऱ्या वेळी सुद्धा आपण या मतदारसंघातून आमदार व्हायचंय आणि या ठिकाणची हॅट्रिक करायची आहे.

