वाचन संस्कृतीमध्येच संस्कार आहेत ; डॉ. सतीश कामत

वाचन संस्कृतीमध्येच संस्कार आहेत ; डॉ. सतीश कामत

*कोकण Express*

*वाचन संस्कृतीमध्येच संस्कार आहेत ; डॉ. सतीश कामत*

*फोडाघाट ःःप्रतिनिधी* 

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मधील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी करूळ येथील मधु मंगेश कर्णिक ग्रंथालयाला भेट दिली. प्रारंभी तेथील ग्रंथपाल क. शेट्ये तसेच ग्रंथालय कमिटीच्या सदस्या गोसावी यांनी विभाग प्रमुख डॉ. सतीश कामत, प्रा. जगदीश राणे व विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

आपल्या मनोगतात बोलताना प्राध्यापक जगदीश राणे म्हणाले की म्हणाले की मधुभाईंचे लेखन हे कोकणी भूमीला समर्पित आहे. त्यांच्या लेखनात करूळचा परिसर चित्रित होतो. त्याचबरोबर मुंबई आणि कोकण हे नाते घट्ट होते. येथील जाती व्यवस्था, संस्कृती, कला, माणसं, माणसांच्या वृत्ती प्रवृत्ती, निसर्ग, प्राणी यांचे यथार्थ चित्रण दिसते. भूमीशी असणारे नाते अधोरेखित होते.

सौ.गोसवी म्हणाल्या की रोडावत चाललेले वाचन संस्कृती जपण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. मुलं वाचनालयाकडे येण्याचा ओढा कमी झाला किंबहुना तो झपाट्याने कमी होत आहे. पुन्हा मुलांना ग्रंथालयाकडे वळवणे आव्हानात्मक आहे. पालक व शिक्षकांनी हे आवाहन स्वीकारले पाहिजे. असे मत व्यक्त केले.

डॉ. सतीश कामत म्हणाले की विद्यार्थ्यांनी वाचलेच पाहिजे. ग्रंथालयातील पुस्तके कपाटात पडून राहतात, त्याच्यावरची धूळ वाचकांन अभावी तशीच राहते हे चित्र चांगले नाही. मधुभाईंनी करूळ सारख्या गावात वाचनालय सुरू केले हे संस्कारक्षम समाजासाठी पोषक आहे. त्यांच्या लेखनात हे संस्कार दिसतात. कोकणी प्रामुख्याने मालवणी सन्मान माणसाचे यथार्थ चित्रण दिसते. त्यामुळे मालवणी माणूस लोकप्रिय झाला. ज्ञात झाला. असे प्रतिपादन केले.

त्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकांची ओळख ग्रंथपालनी करून दिली. अनेक प्रकारची पुस्तके मुलांनी हाताळली. ग्रंथालय व्यवहाराची ओळख ही करून दिली. शेवटी ग्रंथपालनी भेट दिलेले विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे आभार मानले. या उपक्रमाला महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!