*कोकण Express*
*कणकवली महापुरुष मित्रमंडळाचा “मांड उत्सव” उत्साहात साजरा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
प्रतीवर्षी प्रमाणे कणकवली महापुरुष मित्रमंडळाचा “मांड उत्सव” उत्सहात संपन्न.कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कुडाळ – नेरुळ येथील रोंबाटाने प्रेक्षकांची मने जिकंत संपुर्ण कार्यक्रमाचे आकर्षक ठरले. कलमठ, कणकवलीतील अनेक मित्रमंडळानी या रोंबाट स्पर्धेत सहभाग घेतला होता. याचे आयोजन महापुरुष मित्रमंडळाने चांगल्या प्रकारे केले होते.
जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी महापुरुष मित्रमंडळाच्या मांड उत्सवास शुभेच्छा दिल्या चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या रूढी, परंपरा जोपासण्याचे काम या मित्रमंडळाच्या वतीने होत आहे. तसेच युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी महापुरुष मित्रमंडळाच्या मांड उत्सवास शुभेच्छा दिल्या. दरवर्षी चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने केले जाते.मंडळाच्या वतीने आपल्या रूढी, परंपरा जोपसण्याचा वसा महापुरुष मित्रमंडळाने जपला आहे.या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, प्रसाद अंधारी, राजू मानकर, तेजस राणे, राजू सापळे, राजू पारकर,निवृत्ती धडाम, प्रद्दूम मुंज,चेतन अंधारी,अनिकेत उचले,दत्ता सापळे,दादा नार्वेकर, बाळू वालावलकर, मंदार सापळे, हर्षद अंधारी, अमित सापळे, प्रसन्न देसाई, सुमित राणे, सोहम वाळके आदी मान्यवर व महापुरुष मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.