*कोकण Express*
*जिल्हा प्रशासन विरोधात 3 एप्रिल रोजी ‘आक्रोश आंदोलन’ करणार – अभय देसाई यांचा इशारा*
*जिल्हाधिकारी कार्यालयकडून कळणे शेतकऱ्यांच्या भावनांचा खेळ – देसाई यांचा आरोप*
आपणास निवेदन सादर करतो कि दिनांक २९ जुलै २०२१ रोजी सकाळी ७.३० वाजता मौजे कळणे येतील शासन प्रस्थापित मायनिंग प्रकल्पाची तटरक्षक मानव निर्मित भिंत/बंधारा कोसळून साठवण केलेली खनिज माती व प्रचंड पाण्याचा साठा लोंढा कळणे धवडकीवाडीवरील वस्ती व शेतकऱ्यांच्या जमीन क्षेत्रामध्ये घुसून घरांचे, भातशेती, फळबाग लागवड, विहिरी, शेततळी, ग्रामीण पाणी पुरवठा, नळयोजना, नदीपात्र यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेंच साग, फणस व जंगली झाडे हि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. त्याचसोबत शेत-बागायती, सुपीक जमीन ओसाड व पडीक झालेल्या आहेत. कळणे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन रस्त्यावर आलेला आहे. तरी आपले प्रशासन जागे होत नाही. शासनाने रीतसर पंचनामे केलेलं असून आम्हाला ते मान्य आहेत. असे असूनही अद्याप शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्या संधर्भात काही मागण्यांसाठी आम्ही दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी कळणे येथे उपोषण जाहीर केले होते.
माननीय तहसीलदार दोडामार्ग यांनी सर्व उपोषण कर्त्यांसमोर जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासन व संबंधित कार्यालयाशी चर्चा करून १५ दिवसात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापर्यंत निर्णय घेऊन मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन देऊन उपोषण स्थगित केले होते. त्यानंतर दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी गुरे ढोरे आणि सर्व संसार घेऊन प्रांत कार्यालय समोर आंदोलन केले होते तेव्हाही ३० ऑक्टोबर पर्यंत नुकसानभरपाई भेटेल असे फक्त गाजर दिले गेले परंतु कळणे बंधारा दुर्घटनेला जवळपास 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. तब्बल 20 महिनेच काळ उलटून गेला असू अजूनही नुकसानग्रस्त शेतकरी न्याय मिळण्यासाठी तळमळत आहे. अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसून ह्या संधर्भात जिल्हाधिकारी कार्यालय आणि मायनिंग कार्यालय मध्ये भेट देऊन खूप वेळा पाठपुरवठा केला होता. परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही.आपल्याकडून होत असलेल्या अन्याय विरुद्ध आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय – ओरोस येथे 3 एप्रिल 2023 रोजी मोठया प्रमाणात “आक्रोश आंदोलन” करणार आहोत तरी हा इशारा गांभीर्याने घ्यावा कारण माझ्याजवळ अजून काहीही पर्याय राहिलेला नाही आणि याचे जे काही परिणाम होतील त्या सर्वाना आपण आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देसाई यांनी प्रसिद्धपत्रक दयारे जिल्हा प्रशासनला दिला आहे.

