मातृत्ववरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे क्षय रुग्णासाठी सामुदायिक फूड बास्केट सहाय्य्य कार्यक्रम संप्पन ११ क्षय रुग्णांना घेतले दत्तक

मातृत्ववरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे क्षय रुग्णासाठी सामुदायिक फूड बास्केट सहाय्य्य कार्यक्रम संप्पन ११ क्षय रुग्णांना घेतले दत्तक

*कोकण Express*

*मातृत्ववरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे क्षय रुग्णासाठी सामुदायिक फूड बास्केट सहाय्य्य कार्यक्रम संप्पन ११ क्षय रुग्णांना घेतले दत्तक*

*सौ.वैष्णवि मोंडकर,अध्यक्ष मातृत्व वरदान फाऊंडेशन*

केंद्र सरकारने प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानाच्या कोरडा आहार फूड बास्केट योजने अंतर्गत मातृत्व वरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ आयोजित क्षय रुग्ण दत्तक योजनेचा दिनांक १७/३/२३ रोजी शुभारंभ करण्यात आला यावेळी निक्षय मित्र व क्षय रुग्ण दत्तक योजनेची संकल्पना महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्याकडून मांडण्यात आली यावेळी मालवण तालुक्यातील 11 क्षय रुग्णांना दत्तक घेण्यात आले आहे .यावेळी डॉ .शामराव जाधव यांच्या कडे ११ क्षय रुग्णांसाठी फूड बास्केट फाऊंडेशन अध्यक्ष सौ वैष्णवी मोंडकर यांच्या मार्फत सुपूर्द करण्यात आली यावेळी बोलताना डॉ.जाधव म्हणाले की व्यापार व समाजसेवेचं मार्गदर्शक कार्य मातृत्व वरदान फाऊंडेशन व पर्यटन महासंघा कडून होत असून अश्या प्रकारच्या कार्यआरंभा मूळे समाजातील अनेक लोक येणाऱ्या काळात मातृत्व वरदान फाऊंडेशन च्या माध्यमातून क्षय रुग्णाच्या पाठीशी ऊभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच त्यांनी केंद्र सरकारने प्रधानमंत्री टी बी मुक्त योजनेची दिनांक ९/९/२२ रोजी शुभारंभ केला असून क्षय रुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी व्यक्ती संस्था सहभागी होऊन रुग्णाना ६ महिने ते ३ वर्षे कोरडा आहार पुरविला जाऊ शकतो या योजनेत सहभागी होणाऱ्या व्यक्ती ,संस्थेस शासनामार्फत निक्षय मित्र म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या विषयी माहिती दिली त्यांचे स्वागत श्री अवी सामंत मालवण तालुका पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे करण्यात आले.जिह्यातील सर्व क्षय रुग्णांना टप्प्याटप्याने सदर योजने अंतर्गत दत्तक घेण्याचा मातृत्ववरदान फाऊंडेशन चा उद्धेश असून क्षय रुग्णांसाठी बनविलेल्या फूड बास्केट मध्ये तांदूळ,चणे,मूग,मटकी,गहू पीठ,शेंगदाणा ,गूळ,दूध पावडर,खाद्यतेल यांचा समावेश करण्यात आला आहे क्षय रुग्णाला हा कोरडा आहार दिला जाणार आहे सदर आहार कुठलीही एक वस्तू अथवा संपूर्ण फूड बास्केट च्या माध्यमातून व्यक्ती ,सहकारी ,संस्था,वैयत्तिकरित्या क्षय रुग्णांना सहाय्य करून निक्षय मित्र बनू शकतो या योजनेत फाऊंडेशन च्या माध्यमातून सहभाग झालेल्याना 12ए ,80 जी च्या माध्यमातून टॅक्स बेनिफिट ही प्राप्त होऊ शकतो अशी माहिती मातृत्ववरदान फाऊंडेशन अध्यक्ष सौ.वैष्णवि मोंडकर यांनी दिली तसेच या योजनेत सहभागासाठी किंवा अधिक माहिती साठी 8275106375 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी श्री अवि सामंत ,श्री रविकिरण तोरसकर,श्री दादा वेंगुर्लेकर ,श्री मनोज खोबरेकर,श्री कैसर पठाण,श्री मंगेश वाक्कर ,श्री मिलिंद झाड,श्री दादू डिचोलकर ,श्री गौरव लुडबे यांच्या मार्फत क्षय रुग्णांना निक्षय मित्र योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आले.यावेळी सौ महिमा मयेकर मातृत्व वरदान फाऊंडेशन संयोजक ,श्री मनोजकुमार मालंडकर वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक ,श्री अमित सोनवडेकर ,श्री सागर मलये तसचे अन्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!