माडखोल येथे सुरु होणार दुग्ध विकास प्रशिक्षण केंद्र शनिवार ९ जानेवारी २०२१रोजी

 *कोकण Express*
शनिवार ९ जानेवारी २०२१रोजी*
*माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचे उद्घाटन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील माडखोल येथे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, देसाई डेअरी फार्म माडखोल व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते माडखोल येथे दुग्ध विकास प्रशिक्षण केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज सावंतवाडीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यामध्ये दुग्धव्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक मार्फत कर्ज सुविधा उपलब्ध केली जाईल कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण हे मुंबईहून गावी आले आहेत दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना गावांमध्ये रोजगार संधी उपलब्ध होऊ शकेल. यासाठी इच्छुकांनी माडखोल येथील श्री प्रभाकर देसाई यांनी माडखोल येथे मु्हा जातीच्या म्हशी पालनाचा अत्यंत यशस्वी असा प्रयोग केलेला आहे आणि या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच प्रमाणे येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये दहा ते पंधरा प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था केली जाणार आहे. यातून प्रत्यक्ष गोठ्यामध्ये काम करता करता व्यवसाय संबंधी माहितीही या व्यवसायातील तज्ज्ञांमार्फत दिली जाणार आहे सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये किंवा भगिरथ विकास प्रतिष्ठान झाराप येथील कार्यालयामध्ये संपर्क साधावा असे आवाहन यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!