शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क तात्काळ दुरुस्त न केल्यास हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन वर करणार हल्लाबोल

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क तात्काळ दुरुस्त न केल्यास हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन वर करणार हल्लाबोल

*कोकण Express*

*शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क तात्काळ दुरुस्त न केल्यास हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन वर करणार हल्लाबोल*

*नगराध्यक्ष समीर नलावडेंचा हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन कंपनीला इशारा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पॅचवर्क तात्काळ दुरुस्त न केल्यास हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन वर हल्लाबोल करण्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या जुन्या जागेवरील पॅचवर्क अजूनही हायवे ठेकेदाराने केलेलं नाही. खड्डेमय असलेल्या या जागेत डांबर सिलकोट मारून पॅचवर्क करणे अत्यावश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नवीन जागी बसवून सहा महिने झाले तरी अद्याप सर्व्हिस रोडवरील पुतळा हटविलेल्या जागेचे पॅचवर्क करण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपघाताची दुर्घटना होण्याआधीच तात्काळ पॅचवर्क करा अन्यथा हल्लाबोल करण्याचा इशारा नगराध्यक्ष नलावडे यांनी दिला आहे. त्यामुळे हायवे प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी आता त्या ठिकाणच्या कामाला गती देणार की दुर्लक्ष करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!