*कोकण Express*
*कणकवलीत नगरपंचायत स्टॉल धारकांचे पुनर्वसन करणार :-शिशिर परुळेकर*
कणकवली नगरपंचायत स्टॉल हटाव मोहिमेतील बाधित झालेल्या विक्रेत्यासाठी पर्यायी व्यवस्था करणार आहे.त्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दोन जागा बघितल्या आहेत.त्या व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर लवकरच निर्णय घेतला जाईल,अशी मागणी कणकवली स्वीकृत नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी दिली.तसेच नगरसेवक कन्हैया पारकर यांनी पहिल्यांदा आपली अनधिकृत मजल्याची घरपट्टी भरावी,असा टोला त्यांनी लगावला.