*कोकण Express*
*कणकवलीतील हटवलेले स्टॉल धारकांची केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या भेटीसाठी ओम गणेश बंगल्यावर धाव*
कणकवली शहरातील मुंबई गोवा महामार्ग उड्डाणपुलाखाली लागलेले शेकडो अनधिकृत स्टॉल हटवण्याची मोहीम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडून हाती घेण्यात आली आहे. १७ व १८ मार्च या दोन दिवसात स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कणकवली पोलिसांना बंदोबस्तासाठी लेखी पत्र देखील प्राप्त झाले आहे. त्यासंबंधी स्टॉल धारकांनाही लेखी नोटीसा बजावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आज सकाळपासून कणकवली शहरातील स्टॉल हटविण्यात येणार होते. असे असताना १० वा. स्टॉल हटविण्याची कारवाई सुरू होणार होती मात्र काही स्टॉल धारकांनी आपले स्टॉल सकाळपासून टेम्पो मध्ये भरून नेण्यास सुरुवात केली. तर काही स्टॉल धारक हे स्टॉल न हटविण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळत आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपल्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर असल्याची स्टॉल धारकांना माहिती मिळाली. लागलीच स्टॉल धारकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर स्टॉल संदर्भात समस्यांबाबत ओम गणेश बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा झाल्यावर स्टॉल धारक कोणती भूमिका घेणार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे काय निर्णय देणार याकडे सर्व स्टॉल धारकांचे लक्ष लागून राहिले आहे