*कोकण Express*
*कणकवलीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्या लोकार्पणव गणपती साना येथील धबधबा कामाचा शुभारंभ*
कणकवली नगरपंचायतच्यावतीने कणकवली शहराच्या पर्यटनात भर टाकणारे व कणकवली वासियांना क्रीडा क्षेत्रात एक हक्काची जागा मिळवून देणारे कणकवली भालचंद्र महाराज आश्रमाजवळील स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या इमारतीचे लोकार्पण यावेळी केले जाणार आहे. तर त्यानंतर 11 वाजता कणकवली गणपती साना येथे वाहणाऱ्या बारमाही धबधब्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही कामांमुळे कणकवली च्या विकास प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा पार होत असून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समुळे कणकवली शहरातील तरुणांना बॅडमिंटन, कबड्डी असे इंडोर गेम खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा होण्याच्या दृष्टीने हे स्पोर्ट कॉम्प्लेक्स केले आहे. तर कणकवलीच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने बारमाही वाहणारा धबधबा गणपती साना या ठिकाणी केला जाणार आहे. या उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी कणकवली शहरवासी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.