आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब गावातील विकासकामांसाठी १९ लाखाचा निधी मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब गावातील विकासकामांसाठी १९ लाखाचा निधी मंजूर

*कोकण Express*

*आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब गावातील विकासकामांसाठी १९ लाखाचा निधी मंजूर*

*आ. वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकासकामांची झाली भूमिपूजने*

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब गावातील विकासकामांसाठी १९ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये कोळंब मधलीवाडी गुरांचा दवाखाना जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे निधी ४ लाख रु, कोळंब न्हिवे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख रु. कोळंब मुख्य रस्ता रवळनाथ देवस्थान पार ते स्मशानभूमी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ५ लाख निधी देण्यात आला. त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले असून त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या विकासकामांची भूमिपूजने करण्यात आली. गावातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.
याप्रसंगी कोळंब सरपंच सिया धुरी,उपसरपंच विजय नेमळेकर,माजी नगरसेवक भाई कासवकर, ग्रा. प.सदस्य संजना शेलटकर,संपदा प्रभू, नंदा बावकर, निकिता बागवे, स्वप्नील परब, मिर्याबांदा ग्रा.प. सदस्य भारती आडकर, सदा सारंग, संदीप शेलटकर,महादेव पराडकर, बबलू कांदळगावकर, अवि नेरकर, नरहरी परब, ज्ञानदीप केळुसकर, काशिनाथ शेलटकर,गुंड्या पराडकर, जितेंद्र भोजने, बापू बावकर, राजू साळकर, दिलीप नेमळेकर, राकेश लाड, श्रीपाद नेमळेकर, श्रीधर परब, संतोष परब, रोशन नेमळेकर, तात्या गावकर, शेखर पाताडे, प्रथमेश परब, भाग्येश लाड, रवींद्र परब, निवेश चव्हाण, स्वप्नील दळवी, उमेश नेरकर, बाबा नेमळेकर, संजय कवटकर, भास्कर कवटकर, सुनील फाटक, विश्वास भोजने, निखिल नेमळेकर, शरद लोके, गणेश पेडणेकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!