कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ६१ कोटी २१ लाख मंजूर

कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ६१ कोटी २१ लाख मंजूर

*कोकण Express*

*कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ६१ कोटी २१ लाख मंजूर*

*आ. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा आणला भरघोस निधी*

*केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला होते पत्रव्यवहार*

*आणखीन २२ कामांना मंजू केल्याने ग्रामीण भागात रस्त्यांचे बनणार जाळे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ मध्ये, जिल्हा वार्षिक योजना नाबार्ड अर्थसहाय्य ,स्टेट फंड आणि आशियाई विकास बँक या योजनेमधून कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघात ६१ कोटी २१ लाख रुपयांची २२ कामांना ग्रामविकास मंत्रालया कडून मंजूरी देण्यात आलेली आहे. सदरहू कामे मंजूर होण्यासाठी केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.तर भाजपा आमदार नितेश राणे यांनी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे सततचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे ही कामे मंजूर झाली आहे.
१)रा.मा. १७८ ते टेंबवली बस स्टॉप ते गावठाण मोंडतर रस्ता ग्रा.मा. २२९ इजिमा १५ व १६-५ किमी साठी ४ कोटी ७८ लाख ६४ हजार रु.२) प्रजिमा १७ से दहिबाव मिठबाव तांबळडेग रस्ता इजिमा २५-७.१३० किमी साठी ७ कोटी १२ लाख ७४ हजार रु.३)प्रजिमा १९ ते सांडवे कुवळे वीरवाडी रस्ता ग्रा.मा. २८५-४ किमी साठी ३ कोटी १२ लाख ७४ हजार रु.४)रा.मा. १७८ ते तोरसाळे आरे रस्ता इजिमा २०-२.३६० किमी साठी २ कोटी ९ लाख ९ हजार ,५) प्रजिमा ४ ते दाभोळे १७ जोड रस्ता ग्रा.मा. १९१-१.४०० किमी साठी १ कोटी १२ लाख ९४ हजार,६)रा.मा.४ ते खुडी रस्ता इजिमा ३३-४.०४०किमी साठी ३ कोटी २४ लाख ५४ हजार,७)वाघोटण बंदर ते वाघोटण तिठा रस्ता इजिमा १६-२ किमी साठी १ कोटी ७६ लाख रूपये ,८) प्रजिमा ११ ते पडेल रस्ता प्रा.मा. २९-१.८००किमी साठी १ कोटी ५३ लाख ८९ हजार, ९)इजिमा ३ शेर्पे ते बेर्ले शेर्पे तांबळवाडी नापणे धबधबा रस्ता-३.९४० किमी साठी २ कोटी ९७ लाख ३६ हजार, १०) फोंडा पटेलवाडी घाडगेवाडी गांगोवाडी रस्ता १३-२.७०० किमी साठी ३ कोटी ७८ हजार,११)प्रजिमा १५ ते तरंदळे कुंदेवाडी ते सावडाव ब्राम्हणदेव खलांतरवाडी प्रजिमा २० ला मिळणारा रस्ता-३.३०० किमी साठी ३ कोटी २१ हजार ८६ हजार,१२)सांगुळवाडी निमअरुळे अरुळे सडुरे रस्ता इजिमा १०-४.१०० किमी साठी ३कोटी २४ लाख १० हजार,१३)सांगुळवाडी फाटकवाडी रस्ता ग्रा.मा. ११०-३ किमी साठी २ कोटी १३ लाख २० हजार,१४) करुळ भट्टीवाडी रस्ता ग्रा.मा. १५१-१.५०० किमी साठी १ कोटी ७७लाख ८३ हजार,१५)शिरवल जोडरस्ता ग्रा.मा.३९३-४.३८० किमी साठी ३ कोटी ७ लाख ६९ हजार,१६)रा.मा.६६ ते ओसरगाव गावठाणवाडी सडेवाडी बौद्धवाडी ओसरगाव मळेसडा असरोंडी रस्ता -६.२०० किमी साठी ४ कोटी ८३ लाख ६९ हजार १७)प्रजिमा ७ ते हुंबरट मधलीवाडी दळवीवाडी हरिजनवाडी रस्ता-१.७०० किमी साठी १ कोटी ९९ लाख ३५ हजार, १८)असलज मौदे आखवणे हेत मांगवली रस्ता इजिमा ४-४ किमी साठी ३ कोटी ४ लाख ५७ हजार,१९) रा.मा. १७७ ते कोकीसरे बांधवाडी रस्ता ग्रा.मा.८७-२ किमी साठी १ कोटी ४८ लाख ८० हजार,२०)रा.मा. १७७ ते नाधवडे सरदारवाडी रस्ता ग्रा.मा. १५८-१.५०० किमी साठी १ कोटी ४ लाख ४५ हजार,२१)प्रजिमा ७ ते गांगेश्वर लोरे गावडेवाडी ते सोनारवाडी वाघेरी कुळाचीवाडी रस्ता-१.८७० किमी साठी १ कोटी ४६ लाख ७० हजार,२२) प्रजिमा २१ ते नागवे बौद्धवाडी खालची हुलेवाडी आरेवाडी सांगवेकरवाडी रस्ता-३.९२० किमी साठी ३ कोटी १० लाख ७८ हजार अशी कमांजुर झाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!