*कोकण Express*
*विनायक राऊत यांनी जिल्ह्यातील दहशतवादाला मूठ माती दिली; नारायण राणेंना टोला ; संदेश पारकर*
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर म्हणाले की;
सिंधुदुर्गच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये गेल्या नऊ-दहा वर्षांमध्ये फार मोठे योगदान खासदार विनायक राऊत यांच आहे .खरंतर या जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष दहशतवाद जोपासला गेला होता. त्या दहशतवादाला मूठ माती देण्याचं काम राहू त्यांनी केला आहे .या लोकसभा मतदारसंघातून खासदार विनायक राऊत हे दीड लाख मताधिक्याने विजयी झाले. जनतेचे आशीर्वाद ,प्रेम मिळवत खऱ्या अर्थाने राणे ही अपप्रवृत्ती होती .त्या वृत्तीला गाडण्याचं काम खासदार विनायक राऊत त्यांनी केले. राऊत हे तिथेच थांबले नाही तर या पाच वर्षांमध्ये 2200 गावांमध्ये जनसंपर्क ठेवला. अनेकांची जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संघटन मजबूत करण्याचं काम राऊत यांनी केले. पुन्हा खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवले आणि जवळपास पावणेदोन लाख मताधिक्याने पुन्हा निवडून आले.
पुन्हा एकदा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून खासदार विनायक राऊत निवडणूक लढवून या मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा आपली हॅट्रिक करतील. वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना आज आपली सर्वांची जबाबदारी आहे त्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे सामाजिक नेटवर्क उभं करणं, आणि तळागाळातील कडवट शिवसैनिक आणि प्रामाणिक शिवसैनिकाला एकत्र करून आणि जिल्ह्यातील जनतेचा सहभाग करून घेतली जी सत्ता स्थळ आहेत .या सत्ता स्थळांवर शिवसेनेचा भगवा कशाप्रकारे फडकेल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. अजून एक शिवसेनेसमोर मोठी आव्हान आहेत शिवसेनेला संपवण्याचे काम होत आहे. जेवढे शिवसेनेवर आघात संकट येताय तेवढ्याच ताकतीने या जिल्ह्यातील शिवसेना उभारी घेताना दिसत आहे. निवडणुकीमध्ये खरोखरच जनतेचा आशीर्वाद शिवसेनेला मिळणार आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर गद्दारी केली त्यांनाही जागा दाखवण्याची वेळ आली आहे.
खासदार विनायक राऊत यांनी कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना आधार देण्याचे काम राऊत यांनी केले आरोग्य यंत्रणा उभारण्याचं काम केलं या जिल्ह्यामध्ये 966 कोटी रुपयांचा महाविद्यालय सुसज्ज हॉस्पिटल त्यांनी आणलं. नॅशनल हायवे सुद्धा राऊत यांनी आणल, मोबाईल टॉवर आणि नळ पाणी योजना, आणि अनेक विकासाच्या योजना आणण्याचं काम खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत हे नेतृत्व जनतेतला आहे लोकांनी त्यांचा सन्मान केलेला आहे लोकांनी जे निर्णय दिला त्या निर्णयामध्ये राहिलेलं हे नेतृत्व आहे. कितीही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी या जिल्ह्यातील शिवसैनिक आणि जनता शिवसेनेबरोबर कायम राहणार आहे तसेच खासदार विनायक राऊत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जे प्रामाणिक कडवट शिवसैनिक शिवसेनेबरोबर राहिले त्यांचा सन्मान राऊत यांनी केला आहे.