*कोकण Express*
*स्व.दिपक गुरव यांच्या स्मृतीदिनानिमित्त साळिस्ते येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन*
मंगळवार दिनांक २८ मार्च २०२३ रोजी स्व.दिपक गुरव यांच्या स्मृतिदिनानिमित्त साळिस्ते येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.सकाळी ९ ते १० या वेळेत १६ वर्षाच्या आतील मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा,सकाळी १० ते ११ विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींचा सत्कार समारंभ,सकाळी ११ ते १ भव्य दिव्य कामगार मेळावा,सायंकाळी ३ ते ६ महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,मंगळवार व बुधवार दिनांक २८ व २९ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ठिक ७ वाजता भव्य दिव्य शूटिंगबॉल स्पर्धा अश्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन स्व.दिपक गुरव मित्रमंडळ साळिस्ते व भारतीय मजदूर संघ तळेरे प्रभाग यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.तरी या कार्यक्रमात सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशी मागणी मंडळाचे अध्यक्ष अशोक जगताप व विजय गुरव यांनी केली आहे.