*कोकण Express*
*माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शशिकांत इंगळे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शशिकांत इंगळे मित्रमंडळाच्या वतीने कणकवली येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि केक कापून करण्यात आले.
