*कोकण Express*
*सावंतवाडी पालिकेचे कर्मचारी झाले संपात सहभागी..*
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी मंगळवार पासून पुकारलेल्या बेमुदत संपात सावंतवाडी पालिकेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
पाणीपुरवठा व कंत्राटी कामगार वगळता १००% पालिका कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आडारकर, पालिकेचे आरोग्य विभागाचे पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी, लिपिक आसावरी शिरोडकर, भाऊ भिसे, आदी संपात सहभागी झाले आहेत.

