*कोकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशलेत सीसीटीव्ही संस्थार्पण सोहळा संपन्न*
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे दिवंगत चेअरमन एल. डी. सावंत साहेब यांनी जवळ जवळ २२ वर्ष चेअरमन म्हणून कामकाज शेवट पर्यंत पाहिले. आपल्या चेअरमन पदाच्या कार्यकाळामध्ये वडीलकीच्या नात्याने त्यांचे शाळेवर विशेष प्रेम व लक्ष. प्रशासनाचा आणि आर्थिक व्यवहारांचा प्रदिर्घ अनुभव व त्या अनुषंगाने अभ्यास करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती त्यामुळे शाळेच्या कामकाजा बाबत अचूक निर्णय घेण्याची क्षमता. प्रशालेचा विकास आणि कामकाजा बाबत तन मन धन ओतून कार्य. प्राचार्यांपासून सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी वडीलकीच्या नात्याने जोडलेले. परिणामी, मृत्यूनंतरही त्यांची आशिर्वादात्मक कृपादृष्टी या प्रशालेवर कायमस्वरूपी रहावी या उद्देशाने कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे सनदी लेखापाल सन्मा. श्री. तुकाराम रासम यांनी दिवंगत मामा श्री. एल. डी. सावंत यांच्या स्मरणार्थ माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेला 25 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे दि ले आणि बॅकअप साठी लागणाऱ्या साहित्यानिशी दूरदर्शन संच देखील दिला.
एकूण १ लाख 65 हजार रुपये किंमतीचे हे साहित्य संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी सावंत व प्रशालेचे चेअरमन श्री. आर. एच्. सावंत सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. अत्यंत अत्यावश्यक असलेली सदर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा प्राचार्य सुमन दळवी सरांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 10/02/2023 पासून कार्यान्वित झाली आहे. या सुविधेचा फायदा शालेय संकुलांच्या सुरक्षेसाठी निश्चितच होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संचालक मंडळाची पारदर्शक कार्यपद्धती व मिळालेल्या लाखोंच्या देणगीतून साधलेल्या अमुलाग्र बदलाने भारावून रासम महोदय संस्थेचे ऑडिट गेली अनेक वर्षे विनामोबदला करत असतातच पण त्या व्यतिरिक्त संचालक मंडळ,शालेय समिती, प्राचार्य तसेच कार्यालयीन कर्मचारी यांना आर्थिक मांडणी व शालेय व्यवस्थापना संबंधी संगणकीय प्रणाली विकसित करत अचूक मार्गदर्शन करण्याचे महत्वाचे काम त्यांच्याकडून वारंवार होत असते. भविष्य कालीन वाटचालीत संगणकीय प्रणाली द्वारे स्वतः विकसित करत असलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रशालेतील दैनंदिन कामकाजावर संचालक मंडळाला दूरवरून सुध्दा लक्ष ठेवता येईल अशी प्रणाली संस्थेला विनामोबदला देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सन्मा.तुकाराम रासम यांनी प्रशाळेला दिलेल्या दातृत्व बद्दल क. ग. शिक्षण प्रसारक मुंबई मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत यांनी त्यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाला क. ग. शिक्षण प्रसारक मुंबई मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत, उपाध्यक्ष श्री.पी.डी. सावंत, संस्थेचे सदस्य श्री.नागेश सावंत, श्री. व्ही.बी. सावंत सर, प्रशालेचे चेअरमन श्री.आर.एच. सावंत सर, सदस्य श्री.तुषार सावंत मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विदयार्थी उपस्थीत होते.