*कोकण Express*
*रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांचे खारेपाटण येथे स्वागत*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वार असणाऱ्या खारेपाटण येथील शिवसेना पक्षकार्यालयाला अगत्याने भेट दिली. यावेळी त्यांचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात आले. खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर आणि प्रमुख पदाधिकारी यांनी आमदार रवींद्र फाटक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पक्षकार्यालयात भेट देऊन फाटक यांनी उपस्थित ग्रामस्थांशी, स्थानिक पदाधिकारी यांच्याशी विकास कामांबाबत चर्चा करत संवाद साधला. यावेळी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने आमदार रवींद्र फाटक यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका निर्माण करण्यात यावा, या प्रमुख मागणीचे ग्रमस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
